Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली असून, टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.

सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५), गणेश बाबू पवार (वय ३५), मंगल हरफुल काळे (वय १९, सर्वजण रा. मोतीझारा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे (वय २५) हे आपल्या कुटुंबासह कात्रजमधील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. २५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपेत असताना, चिमुकलीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आले. मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात आली. यानंतर त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. याशिवाय गुन्हे शाखेने स्वतंत्र तपासपथक कार्यरत केले. तपासात वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले. पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १४० सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखी दोघे आरोपी दिसून आले.

पोलिस फुटेज आणि माहितीच्या आधारे तपास पथक तुळजापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या ताब्यातून अपहृत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. पुढील चौकशीत उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली. आरोपींनी भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण…

श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…

साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…

बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!