
मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…
मुंबईः एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेला (वय ३५) दहावीच्या एका विद्यार्थ्याचा वर्षभर लैंगिक छळ केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करणे आणि लैंगिक मेसेजेस पाठवून तिने या विद्यार्थ्याचा छळ केला होता.
पीडित 15 वर्षीय विद्यार्थ्याची आईने मुलगा रात्री उशिरापर्यंत फोनवर काहीतरी करत असल्याचे पाहिले. संशय आल्याने त्यांनी मुलाचा मोबाईल तपासला असता, त्यांना शिक्षिकेच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग सापडले. यानंतर, मुलाच्या आईने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शिक्षिकेला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी तिचा फोन जप्त केला असून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संबंधित शिक्षिका इतर 2 विद्यार्थ्यांसोबतही वर्षभरापासून अशाच प्रकारची अश्लील कृत्ये करत असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, त्या विद्यार्थ्यांचे पालक तक्रार दाखल करण्यास तयार नाहीत. आरोपी शिक्षिका इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना शिकवते. ती SSC विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा क्लासेस घ्यायची आणि इन्स्टाग्रामद्वारे या मुलांच्या संपर्कात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील एका शाळेतील 40 वर्षीय शिक्षकाला 16 वर्षीय विद्यार्थ्याचे वारंवार लैंगिक शोषण केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. इंग्रजी भाषेची शिक्षिका अल्पवयीन मुलाला आलिशान हॉटेलमध्ये घेऊन जात अत्याचार करत असल्याचा आरोप होता. संबंधित शिक्षिकेला अटक झाल्यानंतर जामीन मिळाला आहे.
मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…
मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…
नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

