पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…

पुणे: पुणे शहरात मकोका प्रकरणातील कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी गुंडासोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी ‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे.

मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा 2 दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे 50-60 समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. ‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’ म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी लक्ष्मीनगर (शास्त्रीनगर) पोलिस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

रॅलीतील युवकांनी परिसरातील नागरिकांना धमकावले होते, असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. याबाबतचा व्हिडीओ आणि घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती नागरिकांनी लक्ष्मीनगर (शास्त्रीनगर) पोलिस चौकीमध्ये दिली. पण पोलिसांकडून काहीच कारवाई केली नाही, असं स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

दरम्यान, 2021 मध्ये पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता. पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 13 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. यात टोळी प्रमुख प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे याच्यावर मोक्का कारवाई झाली होती. आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दुग्धाभिषेक अन् पुन्हा अटक…

नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…

पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!