वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दबावतंत्रासाठी नाव आल्यानंतर पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक आणि शशांक हगवणे याचे मामा IPS जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी केली आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

भाच्याला बंदुक परवाना मिळवून देण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर यांनीच मदत केल्याचा आरोपही आजच सकाळी त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर, आपली बाजू मांडताना सुपेकर यांनी सारवासारव केली होती. मात्र, सारवासारव केल्यानंतरही राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी केली आहे. सुपेकर यांना महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्याविरुद्ध मीडियातून आवाज उठवला होता. त्यानंतर, कारवाईला वेग आल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या गृह विभागाने परित्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज (शुक्रवार) बदली केली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 च्या 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये नमूद पदावरुन स्तंभ (4) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, प्रशासकीय कारणास्तव, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार, पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. उपमहासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

हा शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने हा आदेश पारीत करण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!