
अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…
मुंबई : मुंबई पोलीसांनी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला पकडले आहे. सैफच्या घरात कसा घुसला? कशी प्लॅनिंग केली? शिवाय, बांगलादेशला पळूण जाणार होतो. याचा खुलासा आरोपीने केला आहे.
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजाद याला अटक करताच पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत अनेक खुलासे केले.
मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आरोपीचे मुख्य नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजाद (वय ३०) आहे. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. ‘‘विजय दास’’ नावाने तो राहत होता. त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की तो बांगलादेशी असावा. अद्याप याविषयी काही स्पष्टता नसून चौकशी सुरू आहे. आरोपी सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता, त्याला माहित नव्हते की तो ज्या घरात चोरी करणार आहे ते बॉलीवूड अभिनेत्याचे घर आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी इमारतीत घुसला होता. आरोपीला जिथे सुरक्षित मार्ग दिसला, तिथे तो गेला आणि तो सैफ अली खान याच्या घरी पोहोचला. अटकेनंतर आता हल्लेखोरालाही न्यायालयात हजर केले जाणार असून, सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानचाही जबाब पोलीस नोंदवणार आहेत. अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर घाबरलेला आरोपी देश सोडण्याच्या तयारीत होता, ही माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी खूप घाबरला होता आणि मानसिक तणावात होता.’
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी खूप घाबरला होता. प्रसार माध्यमांमध्ये ज्या वेळी शहजाद याचा फोटो समोर आला, त्यावेळी एका मुकादमाने त्याला पोलिस शोधत असल्याची माहितीही दिली होती. तसेच, पोलिसांना सामोरे जाण्यासही सांगितले होते. बातम्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर मानसिक तणावात असलेला आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो अनेकांच्या संपर्कात होता. मात्र वेळीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…
करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

