
मुंबईत मुलीवर रात्रभर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीने पार्टीला बोलवलं अन् केला घात…
मुंबई : काशिगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मैत्रिणीने पार्टीच्या बहाण्याने बोलावून तिचा विश्वासघात केला. दोघांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची मैत्रीण शीतल (वय २५) हिने तिला फोन करून पार्टीसाठी बोलावलं होते. शीतलने बोलवलेल्या ठिकाणी पीडित मुलगी गेली असता शीतलने तिची पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या तिघांसोबत ओळख करून दिली. हा सर्व ग्रुप पीडितेला घेऊन पार्टी करण्यासाठी विनय नगर येथील अहत खान याच्या फ्लॅटवर गेला, जिथे तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले.
View this post on Instagram
दरम्यान, काही वेळानंतर मैत्रीण शीतल आणि पीयूष हे दोघे फ्लॅटमधून खाली निघून गेले. यावेळी फ्लॅटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेली पीडित अल्पवयीन मुलगी, अहत खान आणि दुष्यंत सिंह हे तिघेच होते. पीडित मुलगी दारुच्या नशेत असल्याचं पाहून या दोघांनी मध्यरात्रीपासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले. शिवाय, पीडितेच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेनही चोरून नेल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.
पीडित मुलगी रात्रभर घरी न परतल्याने तिच्या आईने तिचा शोध सुरू केला. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी शीतल, पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर हे चारही आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये भोंदूबाबाने आश्रमातच ओलांडली मर्यादा; महिलेवर लैंगिक अत्याचार…
मैत्रीच्या नात्याला काळीमा; घरात घुसले अन् मित्राच्या पत्नीवर केला सामूहिक अत्याचार…
नाशिक हादरलं! युवती आजारी असतानाही दोघांकडून लैंगिक अत्याचार…
महाराष्ट्राला हादरला! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर लॉजवर सामूहिक अत्याचार…
कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप…

