पुणे! कॉलेजच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…

पुणे : एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली होती. विज आल्यानंतर तब्बल 14 तासांनंतर या विद्यार्थिनीची सुटका झाली. मात्र, 14 तास ना अन्न वा पाणी, ना कुणाशी संपर्क झाल्याने ती तरुणी घाबरली होती. रात्रभर शोधाशोध करूनही विद्यापीठ प्रशासन, पोलीस आणि तिच्या कुटुंबीयांना ती विद्यापीठाच्या आवारातील लिफ्टमध्ये अडकल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित विद्यार्थिनी (वय १९) बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वर्ग संपल्यानंतर लिफ्टने जात होती. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच होती. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट थांबली. विद्यार्थिनीने बाहेर पडण्यासाठी लिफ्टच्या दरवाजावर जोरजोरात हात मारले. तसेच मदतीसाठी आरडाओरडही केली. मात्र, तिचा आवाज बाहेर पोहचला नाही. शिवाय, मोबाईल मध्ये नेटवर्क नसल्याने तिचा फोन सुद्धा लागत नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दुसरीकडे, आपल्या मुलीशी संपर्क होत नसल्याने चिंतेत पडलेल्या तिच्या कुटुंबीयांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र, मुलीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विद्यार्थिनीचा शोध घेतला. महाविद्यालय प्रशासनाचे कर्मचारी, पोलीस आणि कुटुंबीयांकडून रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे बिल्डिंगची लिफ्ट सुरू झाली आणि तब्बल 14 तासांनंतर या विद्यार्थिनीची सुटका झाली. मात्र, 14 तास ना अन्न वा पाणी, ना कुणाशी संपर्क झाल्याने ती तरुणी घाबरली होती.

महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घडलेला प्रकार हा निश्चितपणे गंभीर आहे. आम्ही याबाबत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. घडलेल्या प्रकरणाची तांत्रिक चौकशी, यासह सर्व इतर बाबी या समितीकडून तपासली जाईल. हा प्रकार घडला तेव्हा संबंधित भागातील विद्युत पुरवठा 5 ते 6 वेळा खंडित झाला होता. आम्ही स्वतः घडलेल्या घटनेबाबत पोलिसांच्या संपर्कात असून यामध्ये कोणीही दोषी असल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे महाविद्यालय अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पुणे! शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, आरोपी निघाले…

पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…

पुणे शहरात ऐन दिवाळीत रक्तरंजित थरार! ‘लाल्या’ला जागीच संपवलं…

पुणे! पायल झांबरे मृत्यू प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे…

पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!