राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा जागीच मृत्यू; पाहा मृतांची नावे…

जयपूर (राजस्थान): खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्राकडे परतत असलेल्या एका कुटुंबाचा शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींवर सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन जोरात आदळली. यावेळी झालेल्या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. वाहनात एकूण 16 जण होते आणि सर्व महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील होते. अपघातामधील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नंता पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत झालेल्या व्यक्तींची नावं पुढीलप्रमाणे…
सजन दौलत पवार
उषाबाई सजन पवार
माधवी गणेश पवार
साऊ गणेश पवार
कैलास भगवान पवार
अनिता कैलास पवार
जानव्ही कैलास पवार
बाबूलाल दौलत पवार
सुशिलाबाई बाबुलाल पवार

हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…

कल्याणहून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू…

सातारा! महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…

हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!