
वाहनांची तपासणी करत असताना स्कॉर्पिओने महिला कॉन्स्टेबलला चिरडले…
पाटणा (बिहार): वाहनांची तपासणी सुरू असताना वेगाने येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने 3 पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडले. यावेळी झालेल्या अपघातात महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. एसआय आणि एएसआय स्कॉर्पिओच्या धडकेत थेट हवेत उडून रस्त्यावर आदळले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. ही घटना पाटण्यामध्ये अटल पथवर एसकेपुरी पोलिस स्टेशन परिसरात घडली. स्कॉर्पिओवर भाजपचा झेंडा होता.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
एसआय दीपक कुमार, एएसआय अवधेश आणि महिला कॉन्स्टेबल कोमल कुमारी यांना स्कॉर्पिओने धडक दिली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत जखमी झालेल्या चौघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे महिला कॉन्स्टेबल कोमल कुमारी (वय २५) यांचा मृत्यू झाला. कोमल ही नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होती. एसआय आणि एएसआयची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिस तपासणी करत असल्याचे दिसून येते. जहानाबादमधील घोसी भाखरा येथील रहिवासी प्रिन्स कुमारची स्कॉर्पिओ तपासली जात होती. कोमल कुमारी डायल 112 मध्ये तैनात होती.
कोमल कुमारी या नेहमीप्रमाणे बुधवारीही त्या डायल 112 टीमसोबत पोलिस चेकिंग करत होत्या. यादरम्यान स्कॉर्पिओने उडवले. या घटनेत कार चालक प्रिन्स कुमार देखील जखमी झाला. माहितीनंतर एसएसपी अवकाश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चालक फरार असून, त्याला अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत.
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ! इंदापूरचा पोलिस कर्मचारी चिठ्ठी लिहून बेपत्ता…
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

