
वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…
नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. याविषयी माहिती जाणून घेऊयात…
वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी एक आदेश जारी करत, विना HSRP वाल्या सर्व वाहनांना आरटीओमध्ये (RTO) होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामांवरही बंदी घालण्यात आली. सध्या परिवहन विभागाने जुन्या वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आवश्यक असल्याचा आदेश मागे घेतला आहे.
हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आहे तरी काय?
हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) एक होलोग्राम स्टीकर आहे. या स्टिकरवर वाहनाचा इंजिन आणि चॅसी नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहन सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता बनवण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाला जोडलेली असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.
HSRP कसा कराल ऑनलाईन अर्ज…
हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. खाजगी व्हीकल टॅबवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, CNG आणि CNG पेट्रोल यापैकी पर्याय निवडावा लागेल. पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यानंतर वाहनांची कॅटेगरी खुली होईल. यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे पर्याय असतील. यात काही माहिती भरावी लागेल.
शिवाय, गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.
कोणत्या वाहनावर कोणत्या रंगाचा स्टीकर पाहा…
हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. डिझेल गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर लावणे अनिवार्य आहे. दूरवरूनच वाहनांची ओळख पटावी हा या मागचा हेतू आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणे अनिवार्य केले आहे. अनेक प्रयत्नांनंतरही याचा सकारात्मक परिणाम न झाल्याने, परिवहन विभागाने याबाबत सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. याला सुनिश्चित करण्यासाठी 15 डिसेंबरपासून अभियान चालवण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ चार चाकी वाहनांवरच सक्ती असणार आहे.