
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…
अहमदनगर : मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये आज (मंगळवार) घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकाला वाचवण्यात यश आले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना एकसारख्याच दोन घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. पहिली घटना विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई सुरू असताना घडली. या टँकमध्ये 4 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. दुसरी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
वाकडी येथे मांजरीला वाचवताना सहाजण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले. यामध्ये नागरीकांना एकाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. जखमीवर नेवासा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेवासा तालुक्यातील वाकडी येथील एका बायोगॅसच्या विहीरीत एक मांजर पडली. या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण खाली उतरला. यात चक्कर एकजण बुडाला. त्यानंतर एका पाठोपाठ सहाजण बुडाल्याची घटना घडली. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. घटनेनंतर पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेणाने भरलेल्या विहीरीत अजूनही पाच जण बुडालेले आहेत. यातील एक जणाला बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
बुडालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे…
१. माणिक गोविंद काळे
२. संदीप माणिक काळे
३. बबलू अनिल काळे
४. अनिल बापूराव काळे
५. बाबासाहेब गायकवाड
पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…
जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला अन् झाली हत्या…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

