पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता. आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथा बुक्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने दोन्ही हातावर, पायावर, पार्श्व भागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

समर्थ भगत याला झालेल्या जबर मारहाणीनंतर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, युवकाचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी गौरव संजय कुटे (वय २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २० वर्षे), राहुल सोमनाथ लोहार (वय २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी मारहाण करताना केलेले तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

area-37

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!