नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…

नाशिकः नाशिकरोड परिसरात हॉटेल चालकावर दिवसाढवळ्या कोयत्याने वार करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलमधील वेटरला काम करण्यास सांगितल्याने त्याच रागातून वेटर आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्याचा आरोप हॉटेल चालकाने केला आहे.

नाशिकरोड येथील मुक्तिधाममागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव (रा. देवळाली कॅम्प) हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवत आहेत. त्यांच्याकडे राजवाडा देवळालीगाव येथे राहणारा डॅनिअल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे. शुक्रवारी दुपारी मालक नितीन यांनी डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितले. याचा राग त्याला आल्याने डॅनी याने मालक नितीन सचदेव यांच्याशी वाद करत शिवीगाळ केली आणि थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला. थोड्याच वेळात सात जण हॉटेलमध्ये  घुसले आणि थेट नितीन सचदेव हे काउंटरवर बसले असता त्यांना काही समजण्याच्या आत टोळक्याने कोयता रॉडने आणि इतर हत्याराने सपासप वार केले.

नितीन जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाले आणि त्यांच्या मागे हल्लेखोर पळाले. नितीन या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…

नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!