पुणे शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ला यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीचे ०३ गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट २६/०३/२०२४ रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार कुणाला ऊर्फ बाब्या ठाकुर हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडून भापकर मळयाकडील जाणारे रस्त्यावर येणार असुन त्याचेकडे चोरीचे दागिने असल्याची माहिती मिळाली होती. सदरची माहिती उल्हास कदम, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट- ६ पुणे शहर यांना कळवली होती. पुढे युनिटकडील पथकाने पकडले. युनिटकडील पोलिस पथकाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकुर (वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे असल्याचे सांगितले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळून आल्याने ते जप्त केले आहेत. सदर बाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याचे चौकशीमध्ये तिन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
सदर बाबत पोलिस स्टेशनकडील अभिलेख तपासला असता पुढील प्रमाणे…
१) वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ११३/२०२४ भा.द.वि. कलम ३८०,४५७,
२) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२६ / २०२४ भा.द.वि. कलम ३८०, ४५४
३) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. २६ / २०२४ भा. द.वि. कलम ३८०, ४५४, ४५७
एकुण तिन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्हयातील एकुण १,५४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा सिटी इत्यादी पोलिस स्टेशन येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रवीण पवार पोलिस उप आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…

Video: पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!