
पुणे! व्यावसायिक आणि नृत्याचे कार्यक्रम करणारी युवती लॉजवर गेले अन्…
पुणे: पुणे शहरातील नवले ब्रीज परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत गेलेल्या युवकाचा भयावह शेवट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा. 30 एप्रिल रोजी तो आपल्या प्रेयसीसोबत नवले ब्रीज परिसरातील एका लॉजवर गेला होता. याठिकाणी त्याचा प्रेयसीसोबत वाद झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर त्याने युवतीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत युवकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (३८) याने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. आरोपी युवती नृत्याचे कार्यक्रम करायची. दोघांमध्ये मैत्री झाली होती. ३० एप्रिल रोजी दोघे नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गेले होते. दोघांमध्ये वाद झाल्यावर कार्तिकने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी युवती कार्तिकचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे.
कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनी आरोपी युवतीला घर घेण्यासाठी जवळपास २० लाख रुपये दिले होते. याबाबत ते कार्तिककडे विचारणा करत होते. पण युवती पैसे परत देत नव्हती. तिच्या त्रासामुळे आत्महत्या करावे लागेल, असे कार्तिकने तंगराजला सांगितले होते. कार्तिकच्या आत्महत्येस युवती जबाबदार असल्याचा तंगराजांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…
नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…

