
बापरे! स्कॉर्पिओमधून दोन डझन शेळ्यांची चोरी; ओरडू नये म्हणून….
पाटणा (बिहार) : एका स्कॉर्पिओ मोटारीला अपघात झाला होता. मोटारीजवळ जाऊन पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कारण, स्कॉर्पिओमध्ये तब्बल दोन डझन शेळ्या कोंबल्या होत्या तर त्या ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारच्या छपराजवळ असलेल्या हनुमानगंज गावात चोरांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ सोडली होती. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी उघडून तपास केला असता त्यामधून दोन डझन शेळ्या व म्हशी जप्त केल्या. प्रत्येकाच्या तोंडावर टेप लावला होता. मुक्या जनावरांना ओरडता येत नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येत असल्याचे अनेकांनी पाहिले. शिवाय, गुदमरल्यामुळे पाच मुक्या जनावरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शेळीपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.
हनुमानगंज गावाजवळ कोल्ड स्टोरेजजवळ एक स्कॉर्पिओ दुर्घटनाग्रस्त होऊन बेवारस स्थितीत होती. यावेळी त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता स्थानिकांना धक्का बसला. स्कॉर्पिओमध्ये दोन डझन शेळ्या होत्या आणि त्यांचे तोंड टेपने बंद केलेले होते. शेळ्या चोरणाऱ्या टोळीतील सदस्य रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओमध्ये वेगवेगळ्या गावात जाऊन शेळ्या चोरून वाहनात ठेवतात. शेळ्यांना आवाज करू नये तसेच कुणालाही कळू नये म्हणून चोरांनी शेळ्यांच्या तोंडाला टेप लावला. शिवाय, मोटारीमधील काही दिसू नये म्हणून त्यांनी काळी काच लावली होती. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…
विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…
पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…
सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू…
संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…

