
बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक
न्यूयॉर्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा कुख्यात गँगस्टर लाँरेन्स बिष्णोई याचा भाऊ आहे.
अनमोल बिष्णाई याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. त्यानंतर अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे. एफबीआय आणि भारतीय तपास यंत्रणांमध्ये प्रत्यार्पणाबाबत चर्चा सुरू असून, अनमोल याला येत्या काही दिवसांत भारतात आणले जाऊ शकते.
अनमोल याने अमेरिकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश केला असल्याचे अमेरिकन यंत्रणांना आढळून आले आहे. अनमोल 15 मे 2022 रोजी भानूच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवून अमेरिकेला पळून गेला. परंतु यूएस इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाच्या कागदपत्रांसह जोडलेले एका कंपनीचे संदर्भ पत्र बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनमोल बिष्णोई याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसावाला याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. मुसावाला याची मे 2022 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अटकेच्या आठ महिन्यानंतर अनमोल बिष्णोईची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पलायन केले होते.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर…
बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…

