
पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; कसा आणि कधीपर्यंत पाहा…
पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे. वाहतुकीत करण्यात आलेले बदल हे रविवार दुपारी दोन ते सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
वाहतुकीतील बदल पाहा…
पुणे व पिंपरी चिंचवड शहराकडून, नगर रोडवरुन अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी (पेरणेफाटा विजयस्तंभाकडे जाणारी वाहने वगळून) 31 डिसेंबर रोजी दुपारी दोन पासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेवून मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेवून पुर्ण सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
सोलापूर रोडवरुन आळंदी, चाकण याभागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेवून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर हायवेने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
इंद्रायणी नदीवरील आळंदी तुळापूर हा पुल 10 जानेवारी 2022 रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण- शिक्रापूर रोडचा वापर करावा.
विश्रांतवाडी लोहगाव मार्गे वाघोली व वाघोली लोहगाव मार्गे विश्रांतवाडीकडे जाणारी जड वाहतूक 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान बंद करण्यात येत आहे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

