वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…

पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे घरफोडी चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 6ने ताब्यात घेतले असून, 02 मोबाईल जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

युनिट 6 कडील पो ना 7656 प्रतीक लाहीगुडे, पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे, पो अंम 10419 नितीन धाडगे हे 25/12/2023 रोजी युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. ऋषीकेश व्यवहारे व रमेश मेमाने यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फतीने माहिती मिळाली की, वाघोली येथे घरफोडी चोरी करणारा एक जण हा बाजारतळ वाघोली येथे उभा असून त्याच्याजवळ सदर घरफोडीतील 02 मोबाईल आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीची खातरजमा करुन वपोनि रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करणेबाबत आदेशित केले. आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मोहम्मद शाद मोहम्मद शाहिद अन्सारी (वय 18 रा. संतोष कुलाळ यांचे भाड्याचे खोलीत, काळूबाईनगर, वाघोली, पुणे मूळ- मोहल्ला सत्यान, तालुका बढापूर, जि बिजनौर, राज्य उत्तरप्रदेश) असे सांगितले.

आरोपीकडे अधिक तपास करता त्याने 24/12/2023 रोजी पहाटे 05:00 वा चे सुमारास स्टार डायग्नोस्टिक सेंटर, केसनंद फाटा, वाघोली, पुणे येथील रुममधे उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करुन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील सॅमसंग व मोटोरोला कंपनीचे एकूण 02 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लोणीकंद पो स्टे गु र नं. 1014/2023 भा दं वि क 380 हा गुन्हा उघडकीस आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी लोणीकंद पो स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे (अपर पोलिस उप आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलिस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पो हवा रमेश मेमाने, पो ना प्रतिक लाहीगुडे, पो अंम ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे पथकाने केली आहे.

kashmir
kashmir

पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्याला युनिट 06ने घेतले ताब्यात..

वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश…

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…

वाघोलीमध्ये रिक्षा चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!