
‘गजानन महाराज’ बनून फिरणारी व्यक्ती कोण? समोर आली माहिती पण…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये रविवारी रात्री गजानन महाराज अवतरल्याची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी दर्शनासाठी धाव घेतली होती. गजानन महाराज म्हणून अवतरलेल्या व्यक्तीकडे बँकेचे पासबुक आढळले आहे. पासबुक जरी महाराजांकडे मिळाले असले तरी ते महाराजांचे नाही. केवळ तीन तासात भक्तांना दर्शन देऊन, ती व्यक्ती गेली कुठे? याचा शोध सध्या पोलीस प्रशासनापासून सर्वच करत आहे. यानंतरही परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
गजानन महाराजांसारखी वेशभूषा, भगवी शाल, महाराजांसारखीच बसण्याची पद्धत आणि गजानन महाराजांसारखेच तेज गजानन महाराजांसारखी हुबेहुब दिसणारी ही व्यक्ती तीन तासात भक्तांना दर्शन देऊन गेली कुठे? याचा शोध घेतला जात आहे. पण, या कथित महाराजांकडे एक बँकेचे पासबुक आढळले आहे. पासबुक जरी महाराजांकडे मिळाले असले तरी ते महाराजांचे नाही.
गजानन महाराजांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीजवळ शेषराव रामराव बिराजदार या नावाच्या व्यक्तीचे पासबुक सापडले. मात्र ही व्यक्ती शेषराव बिराजदार नाही, अशी माहिती घुगगी सांगवी येथील पोलीस पाटलांनी दिली आहे. बिराजदार हे विविध धार्मिक स्थळांना भेटी देतात. पण, फोटोमध्ये गजानन महाराजांची वेशभूषा केलेला व्यक्ती शेषराव बिराजदार नाही. गजानन महाराजांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीजवळ शेषराव बिराजदार यांचे पासबुक कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, केवळ तीन तासात भक्तांना दर्शन देऊन, ती व्यक्ती गेली कुठे? याचाच शोध सध्या पोलीस प्रशासनापासून सर्वच करत आहे. पासबुक सापडले पण ते महाराज काही सापडले नाहीत. महाराजांना शेगावच्या रेल्वे स्टेशनबाहेर सोडल्यानंतर महाराजांचे पुन्हा दर्शन झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…