‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…

औरंगाबाद: पिस्तुलासारखे शस्त्र हातात असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्या कथाकथित पिस्तुल्या भाईला जवाहरनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी हे बॅनर काढले असून, या भाईसह त्याला शुभेच्छा देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री) आणि माया भाई ऊर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथनगर, विजय चौक, गारखेडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी जवाहरनगरचे पोलिस नाईक पुंडलिक विनायक मानकापे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन महाराज चौकात प्रशांत सासवडे याला शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर सासवडे याचा माया भाई असा उल्लेख केलेला होता. एवढच नाही तर त्याच्या हातात पिस्तुलासारखे शस्त्र असल्याचे फोटो देखील बॅनरवर पाहायला मिळत होते. बॅनरवर संतोष थोरात याचा शुभेच्छुक म्हणून उल्लेख आहे. भर चौकात लावण्यात आलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. या बॅनरची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीररीत्या गजानन महाराज चौकात सार्वजनिक रस्त्याला लागून वाढदिवसांचे शुभेच्छा देणारे बॅनर देणारे बॅनर लावण्यात आले होते. बॅनर लावून सार्वजनिक रस्त्याचे विद्रूपीकरण करुन औरंगाबाद पोलिस आयुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने या दोन्ही आरोपींच्या विरोधात भा.द.वी कलम 188 भा.द.वी सहकलम महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135,सहकलम महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…

सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!