शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…

छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. साधारण 6 ते 6:30 वाजेदरम्यांन दर्गा ते शेंदूर वादा रोडवरील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बिडकीन ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची पाहणी केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बिडकीन पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात व्हनगुत्ती येथील पती-पत्नीने दोन व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक झाल्यावरून गुरुवारी (ता. २७) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!