
गंगाधाम चौक अपघात! माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा…
पुणे : पुणे शहरातील गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे सासरे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. झाला कॉम्प्लेक्स समोर, शनेश्वर बंगला, गंगाधाम चौक) हे दुचाकी चालवत होते. त्यांच्या मागे दीपाली युवराज सोनी (वय २९) बसल्या होत्या. त्या मार्केटयार्डमधील एका शाळेतून मुलीचे शालेय साहित्य घेऊन घरी निघाले होते. गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच ते बिबवेवाडीच्या दिशेने वळताना मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.
जगदीश गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकचालकाचे नाव शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, पुणे) असे आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी अपघातात सासूचा मृत्यू, सून जखमी
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
”माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा…” सात वर्षांच्या गार्गीच्या या हळव्या प्रश्नाने उपस्थितांचे मन हेलावले. अपघातात दीपाली सोनी यांचा मृत्यू झाला. त्यांना मुलगा विराज आणि सात वर्षांची मुलगी गार्गी आहे. बुधवारी सकाळी घरातून निघताना दीपाली गार्गीला म्हणाल्या होत्या की, ”तुझं दप्तर घेऊन येते’ पण त्यांचा मृतदेहच घरी आला. सोनी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. त्यांचा पानविक्रीचा व्यवसाय आहे. दीपाली यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

