पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूर परिसरातील (कानपूर) भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या हृदयद्रावक चिठ्ठीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. “काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे, माझ्या प्रिये (पत्नीला उद्देशून. प्रेमाचे दोन शब्द […]
अधिक वाचा...प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…
ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता. प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी […]
अधिक वाचा...गौरी पालवे प्रकरण! अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाबात सांगितले…
मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. गौरी यांना घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. […]
अधिक वाचा...नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज (रविवार) सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांमध्ये गोविंद […]
अधिक वाचा...पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…
पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सागर पवार हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर […]
अधिक वाचा...पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…
पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी उशिरा एका युवतीने 9व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित युवतीची ओळख पटवली असून तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. मानसी (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही सांगितले आहे. “मी घरातल्या लोकांच्या […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचा पी.ए. अनंत गर्जे पत्नी प्रकरणी न्यायालयात ट्विस्ट…
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गौरीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. न्यायालयात आज (गुरुवार) याबाबत सुनावणी झाली. अनंत गर्जे याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून, 2 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जे […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…
नाशिक : नाशिकमध्ये नवविवाहित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विवाहितेच्या सुसाईड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास दिला जात […]
अधिक वाचा...गौरी पालवे यांच्या वडिलांच्या आरोपामुळे पंकजा मुंडेंच्या पीएच्या वाढल्या अडचणी…
बीड : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्यावर गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीची हत्या झाली, त्यानंतर ती आत्महत्या दाखवण्यात आल्याचा आरोप गौरी पालवे यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात जे काही करायचं ते करा, पण आम्हाला न्याय द्या अशी मागणी गौरी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पंकजा मुंडे […]
अधिक वाचा...प्रसिद्ध महिला पत्रकाराचा न्यूजरुममध्ये सापडला मृतदेह; लग्नाला अवघे १५ दिवस…
गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या लग्नाला अवघे १५ दिवस बाकी होते. रितुमोनी रॉय गुवाहाटी येथील रहिवासी होती, परंतु कुटुंबापासून ती वेगळी राहत होती. ‘सच द रियलिटी’ या डिजिटल न्यूज […]
अधिक वाचा...
