गौरी पालवे प्रकरण! अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाबात सांगितले…

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते.

गौरी यांना घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. तसेच तिच्या गर्भपाताच्या पेपरवर नवऱ्याचे नाव अनंत गर्जे असे होते. आता या प्रकरणात अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाब नोंदवला आहे. गौरी यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेवर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता जुन्या प्रेयसीने वरळी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. २०२२ पासून माझा आणि अनंतचा काहीही सबंध नाही. गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काहीही कल्पना नाही असे जुन्या प्रेयसीने म्हटले आहे.

दरम्यान, गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत फ्लॅटच्या खिडकीतून आतमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला तेंव्हा ती मृत झाल्याचे कळताच त्याने स्व:ताचे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तसेच पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवला आहे.

अनंत गर्जेची मानसिक तपासणी देखील होणार आहे. पोलिस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गरजेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. तसेच आरोपी अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांचा पी.ए. अनंत गर्जे पत्नी प्रकरणी न्यायालयात ट्विस्ट…

गौरी पालवे यांच्या वडिलांच्या आरोपामुळे पंकजा मुंडेंच्या पीएच्या वाढल्या अडचणी…

अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…

गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!