बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…

नांदेड : आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्याने युवकाचे दोन्ही हात छाटल्याची धक्कादायक घटना भाग्यनगर परिसरात घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असे हात गमावलेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी मोहम्मद तौहीद हा फरार आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आले आणि लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा युवक हातगाड्यावर फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणातच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!