
सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…
सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (दोघे रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली.

पीडित अल्पवयीन मुलीची आई मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरून घरी आली. तेव्हा मुलगी घरी नव्हती, मुलीबद्दल तिने आजूबाजूला विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने तिने पोलिसांना संपर्क साधला. काही वेळात पोलिस पीडित मुलीस घेऊन आले. आईने मुलीकडे विचारपूस केल्यावर ही घटना मुलीने सांगितल्यानंतर मोठा धक्का बसला.
माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही घटना घडली त्या ठिकाणावरून जवळपास १ किलोमीटर अंतर रात्रीची थंडी आणि अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली. शहराच्या जवळच्या एका चौकात आल्यावर नागरिकांनी तिला कपडे दिले. तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीस त्यांच्या हवाली केले. या घटनेनं संताप व्यक्त केला जात असून पिडीतेला न्याय मिळावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हणाला…
सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार! राजकीय नेत्याची वाढदिवशीच भर स्टेजवरच हत्या…
सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…
सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं…
सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

