पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री युवकाची हत्या करण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे शहारतील गुलटेकडी परिसरात […]
अधिक वाचा...पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…
पुणे : पुण्यात भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ गणेशवाडी परिसरात अपघाताची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित सुरेश पवार (वय ३६) आणि सुरेश प्रभाकर पवार (वय ६२, दोघे रा. ट्रिनिटी सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात त्यांची बहीण, मेहुणा, भाच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपी संजीवनी कोमकर ही वनराज आंदेकर यांची बहीण तर जयंत हा मेहुणा आहे. कौटुंबिक वादातूनच वनराज आंदेकरची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला तेव्हा बहीण संजीवनी गॅलरीतच […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) नाना पेठेत गोळीबार करण्यात आला.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांची हत्या ही कौटुंबीक वादातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदेकर […]
अधिक वाचा...सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
पुणेः पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजीत इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. पुण्यातील नाना पेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांची चार दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला. गेल्या […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठेत रविवारी (ता. १) रात्री साडे आठच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड त्यांच्या सख्ख्या बहिणीचा पतीच असल्याचे समोर आले आहे. आंदेकर यांच्याशी जुना वाद असलेल्यांना हाताशी धरून दाजीने ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. वनराज […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीने पोलिस ठाण्यातच पोलिसांसमोर धमकी दिली होती. ‘आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. १) रात्री नाना पेठेत घडली. या घटनेनंतर काही वेळातच पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. वासुदेव कुलकर्णी हे एका फायनान्स कंपनीत […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रविवारी (ता. १) रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, या घटनेने हादरले आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
पुणे: पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिना खान या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या मागचा खरा सूत्रधार तिचा सख्खा भाऊ निघाला आहे. सकिना हिचा सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना हिचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...
