पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलिसांनी घरफोडी चोरी करणा-या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुरनं ३१७ / २०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार करीत असताना ०२/१०/२०२४ रोजी तपास पथकातील पोलिस अंमलदार संजय बादरे, अमजद शेख, वामन सावंत व किशोर भुसारे यांना त्यांचे खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हा गुन्हा करून तो सध्या त्याचे गावी मोघा (ता.उदगीर, जि. लातूर) येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

सदर आरोपीचा लातूर येथे जावून शोध घेतला असता तो त्याचे घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. शेखर संभाजी जाधव (वय २५ वर्षे, रा. मु.पो. मोघा, ता.उदगीर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. त्यास चौकशीकामी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे आणून त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता त्यास अधिक विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. अधिकचे तपासामध्ये त्याचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल पॉवर बँक व कार चार्ज असा १,४३,४५०/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे. आरोपीला विश्वासात घेवून तपास केला असता त्याने हडपसर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, चंदननगर पोलिस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल, भोसरी पोलिस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल असा एकुण २,४२,५००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलिस स्टेशन कडील एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४, हिंमत जाधव, सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, श्रीमती कांचन जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), शंकर साळुंखे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलिस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…

विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…

पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!