
पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपयाच्या एकुण २५० नकली चलनी नोटा जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांचे आदेशाने सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे सहकारनगर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पुणे-सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर पोलिस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना एक व्यक्ती गडबडीने स्वारगेटचे दिशेने जात असल्याचे दिसला. त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. निलेश हिरानंद विरकर (वय ३३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन समोर चिंचवड पुणे) असे त्याचे नाव आहे. गडबडीत निघुन जाण्याचे कारण विचारता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्याचेकडे विचारणा करीत असताना तो त्याचे पँटचे डावे खिशात सारखा हात घालून काहीतरी लपवीत असल्याचे दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्याचे खिशात ५००/- रुपये किमतीच्या नोटांचे एक बंडल मिळून आले. त्याबाबत त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदरच्या नोटा नकली असून त्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या असे सांगीतले.
सदरच्या नोटा नकली असल्याची त्याने कबुली दिल्याने सदर बाबत सहकारनगर पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सदर ठिकाणी हजर राहुन सदरबाबत खात्री करुन सुचना व मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार सदर आरोपीचे ताब्यातून ५००/- रुपये दराच्या एकुण २५० नकली चलनी नोटा गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आल्या आहेत. सहकारनगर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३३९ / २०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ-२,पुणे शहर स्मार्तना पाटील, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे नंदिनी वग्यानी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहकारनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर छगन कापसे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पो.स्टे. चे तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक सागर पाटील, सहा.पोउपनिरी बापु खुटवड व पोलिस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार,अमित पदमाळे,,खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, महादेव नाळे, सागर कुंभार यांनी केली आहे.
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…
पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…

