चिंचवडमध्ये 1 हजार 440 लिटर देशी दारू जप्त

पुणे : पोलिसांनी संशयिताच्या जीपची तपासणी केली असता 1,440 लिटर देशी दारू आढळून आली. एक जीपसह देशी दारूसह रु. 5.94 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गुंडा विरोधी पथकाने सोमवारी दुपारी 1 वाजता दळवीनगर, चिंचवड येथे 1,440 लिटर देशी दारू जप्त केली. कुणाल नवनाथ चव्हाण (वय ३५, रा. आनंदनगर वसाहत, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय गंभीरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परिसरातील दळवीनगर येथे दारू वाहतूक करणारे वाहन येत असल्याची माहिती पोलीस हवालदार विजय गंभीर यांना मिळाली. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस हवालदार चव्हाण, मेदगे, घमपुरे यांनी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी संशयिताच्या जीपची तपासणी केली असता 1,440 लिटर देशी दारू आढळून आली. एक जीपसह देशी दारूसह रु. 5.94 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!