
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
मुंबई : दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश यशवंत हुमने (वय ३३, मूळ रा. रत्नागिरी) असे महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक महिला ही पोलीस कॉन्सटेबल आहे. योगेश याने आतापर्यंत अनेक मुलींची फसवणूक करून त्याने त्यांना लाखो रुपयांना लुबाडले आहे. यातल्याच एका महिलने योगेशविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
योगेश हा सोशल मीडियाचा वापर करून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांच्यासोबत ओळख वाढवायचा. महिलांसोबत जवळीक वाढल्यानंतर योगेश मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. विवाहित असूनही योगेश आपण अविवाहित असल्याचे तो मुलींना सांगत असे. दोन मुलींसोबत लग्न केल्यानंतर त्याने तिसरीसोबत लग्नाची बोलणी केली, एवढच नाही तर लग्नाची सुपारीही फोडण्याचा कार्यक्रमही धुमधडाक्यात करण्यात आला. यानंतर चौथीसोबत बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होता, यासाठी त्याने लग्नाची बोलणीही सुरू केली, पण फसवणूक झालेल्या एकीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर योगशेचे बिंग फुटले आणि त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

