मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत संपवलं…

नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरुच आहे. सातपूर परिसरात शनिवारी (ता. २६) खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. विश्वनाथ उर्फ बबलू सोनवणे (वय २७)असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…

नाशिक : अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून केलेल्या हल्ल्यात संदीप नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता आणि यातूनच संदीप याचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी संदीप याने ओम पवार उर्फ ओम्या खटकि यांना मारहाण केली होती. […]

अधिक वाचा...

भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…

नाशिक : अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या युवकावर दिवसा ढवळ्या सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना आहे. भाजी विक्रेता संदीप आठवले याच्यावर चार ते सहा हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यात […]

अधिक वाचा...

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

नाशिक: सिन्नर तालुक्यातील शहा येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री उघडकीस आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन युवकांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी नवनाथ जाधव (16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव […]

अधिक वाचा...

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिक : नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अंबड भागात एकाच दिवशी दोन युवकांचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

नाशिक: घरामध्ये दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही. घरातल्या लोकांना ही बाब कळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे (वय १०) याचा घरातील […]

अधिक वाचा...

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

नाशिकः नाशिकरोड परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नाशिक पोलिसांनी गुंडाची धिंड काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिक पोलिसांनी जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. शिवाय, त्यांची नाशिकरोड परिसरातून धिंड काढली. नागरिकांकडून पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची […]

अधिक वाचा...

धक्कादायक! गळा कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह…

नाशिक: सातपूर परिसरातील विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक्तीबाई बैस (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मुळ मध्य प्रदेशची आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!