
Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…
लखनौ (उत्तर प्रदेश): बागपत येथील बडौत कोतवाली परिसरातील एक महिला आपल्या प्रियकरासोबत लॉजवर गेली होती. महिलेला तिच्या पतीने पोलिसांसह रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती हॉटेलच्या छतावरून उडी मारून फरार झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
संबंधित महिला बागपतच्या छपरौली पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी आहे आणि तिचे पतीसोबत वारंवार वाद होत होते. या वादांचे निराकरण करण्यासाठी एसपी कार्यालयातील महिला सेलने पती-पत्नीला अनेक वेळा समुपदेशनासाठी बोलावले होते. ती महिला सेलमधून तिसऱ्यांदा मध्यस्थी करून परतत होती. परतताना ती बागपतहून बडौतला जाणाऱ्या बसने प्रवास करत होती आणि बडौतला पोहोचल्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत दुचाकीवर बसून लॉजवर गेली.
महिलेच्या पतीने तिचा पाठलाग केला आणि डायल 112 वर पोलिसांना माहिती देऊन त्यांना घटनास्थळी बोलावले. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचताच महिला घाबरली आणि पकडले जाण्याच्या भीतीने तिने सुमारे 12-13 फूट उंचीच्या हॉटेलच्या छतावरून खाली उडी मारली. त्यानंतर ती घटनास्थळावरून फरार झाली. महिलेच्या उडी मारण्याचा व्हिडिओ एका रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, व्हायरल व्हिडिओच्या आधारावर पुढील कारवाई केली जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हॉटेलने महिला आणि तिच्या प्रियकराची ओळखपत्रे तपासली होती का? याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
#यूपी के #बागपत में पति ने अपनी पत्नी को होटल में प्रेमी के साथ पकड़ा। पति को देखकर पत्नी होटल की पिछली खिड़की से कूदकर मौके से फरार हो गई।
पुलिस के सामने पति ने पत्नी से जान का खतरा होने की कही बात है। पति का कहना है कि पत्नी अपने प्रेमी के साथ मिलकर उसकी हत्या करवा सकती है। pic.twitter.com/ANfXBWXd69
— Devesh Pandey (@iamdevvofficial) June 17, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागपतच्या तुगाना गावातील युवतीचे लग्न २०१९ साली ककोर गावातील युवकासोबत झाले होते. दोघांना एक मुलगा आहे. दोघे एकत्र राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये भांडणे होत आहेत. बायको खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते, असा पीडित नवऱ्याचा आरोप आहे. पत्नी आणि सासू यांनी इतरांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. मारहाण प्रकरणी नवऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर नवरा आणि बायको या दोघांचं समुपदेशन सुरु आहे. दोघांचं आतापर्यंत तीनवेळा समुपदेशन झालं आहे.
नवऱ्याने सांगितले की, ‘पत्नी प्रियकराच्या दुचाकीवर बसून जात होती. त्यावेळी भावाने बघितले. त्यानंतर दोघांचा पाठलाग केला. दोघे एका लॉजमध्ये गेले. नवऱ्याने ही बाब पोलिसांना फोन करून कळवली. यानंतर बायकोला नवरा लॉजमध्ये आल्याचे कळताच तिने छतावरून उडी मारली. या प्रकरणी पोलिसांनी बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर नवऱ्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले अन् आईला, भावाला बोलावले…
Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…
प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…
सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

