अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्यापही मोकाट आहेत. सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर आला आहे. दोन पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्या स्टाफने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची मागणी केली. सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलिस आरोपीला घेऊन येणार आहेत. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरातच झालेल्या चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. यानंतर सैफ आणि त्याच्या घराच्या सुरक्षेबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान हल्लेखोराचे सैफच्या घरातील सदस्याशी कनेक्शन समोर आले आहे. चोरट्याने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा […]
अधिक वाचा...साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…
मुंबई : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. प्रफुल सुर्वे असे मृत्यू झालेल्या या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत […]
अधिक वाचा...महिलेचा किस घेऊन पळलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये चोरी करायला आलेल्या चोरट्याला मौल्यवान वस्तू न सापडल्याने त्याने जाताना महिलेचा किस घेऊन पळ काढला होता. पीडित महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करून चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. कुरार पोलिसांनी सांगितले की, महिलेचा विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…
मुंबईः डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनचालकांवर कारवाई करत होते, याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. वाहतूक सहपोलिस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. वाहन चालकांनी वाहनाची […]
अधिक वाचा...नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून…
नवी मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे भागात बुधवारी (ता. १) आई आणि मुलाची राहत्या घरात मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. समलैंगिक संबंधाच्या मागणीवरून हत्या झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये 1 जानेवारीला गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा […]
अधिक वाचा...पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी…
मुंबई : पोलिस हवालदाराला धावत्या रेल्वे समोर ढकलून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतमधील रबाळे-घणसोली रेल्वे स्थानका दरम्यानच्या रुळावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विजय रमेश चव्हाण (वय ४३) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे. विजय रमेश चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनला कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...नवी मुंबईत पोलिसांनी दरवाजा उघडला अन् आढळा माय-लेकाचा मृतदेह…
मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमधील घरात आई आणि मुलाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसत आहेत. गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (वय ४५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे […]
अधिक वाचा...
