पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाने मैदानी परिक्षेच्या तारखांच्या होत असलेल्या मागणीची दखल घेतली आहे. पोलिस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. राज्यात […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी…
जालना: मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
छत्रपती संभाजीनगर : वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत संपत वाहूळ (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 17,471 पदांसाठी भरती होत असून, भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याकडून करण्यात आली आहे. एका जिल्ह्याची निवड करून हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; कोण पाहा…
मुंबईः राज्यातील सहायक पोलिस निरीक्षपदी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असूनही अनेक पोलिस अधिकारी या बढतीपासून दूर होते. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची मदत घेतली आणि त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
धुळेः पाकिस्तानमधून सहीसलामत भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांना धुळे महापालिकेत आज (शनिवार) पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पालिकेमध्ये अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे आजी-माजी जवानांमध्ये खळबळ उडाली आहे. जवान चंदू चव्हाण हे सध्या पठाणकोठ येथे लष्करात कार्यरत असून, सध्या ते सुट्टीवर आले आहेत. लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना घराचा […]
अधिक वाचा...बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…
गडचिरोली : छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमा भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ निवडत आपल्या साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेऊन तीन माओवाद्यांना ठार केले आहे. 6 एप्रिल 2010 रोजी माओवाद्यांनी जवांनांवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफचे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. साथीदारांच्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…
मुंबईः महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सध्या बंपर भरती सुरु असून, या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. पोलिस भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…
नाशिक : राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यांत झालेल्या हिंसक बाबींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने झाली. या आंदोलनांदरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. या हिंसक आंदोलनांमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याला बाधा […]
अधिक वाचा...
