
महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; कोण पाहा…
मुंबईः राज्यातील सहायक पोलिस निरीक्षपदी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असूनही अनेक पोलिस अधिकारी या बढतीपासून दूर होते. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची मदत घेतली आणि त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
राज्य पोलिस दलाच्या तुकडी क्रमांक 103 मधील जवळपास 440 सहायक पोलिस निरीक्षकांना या पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. साधारण अडीच वर्षांपासून या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मुद्दा प्रलंबित राहिला होता, ज्याचा थेट फटका 600 पोलिस कर्मचाऱ्यांना बसला होता. पण, अखेर मंगळवारी बढतीसाठी पात्र असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
निरीक्षकपदी असणाऱ्या रिक्त जागांची संख्या पाहता या पदोन्नती प्रक्रियेला वेग मिळणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. पुढील 15 दिवसांमध्ये या पदोन्नतीसंदर्भातील अंतिम यादी तयार केली जाणार असून, मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये अधिकृत बढती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पदोन्नतीपासून दूर राहिलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती घेण्यास नकार…
रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

