क्यूआर कोड, एआय व्हॉईससारख्या बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन…

मुंबईः क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी देणाऱ्या अॅप्सवरून होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नयेत आणि संशयास्पद लिकवर क्लिक करणे टाळावे, कारण यामुळे सायबर गुन्हेगार, नागरिकांचा डेटा चोरी करू शकतात. उपकरणांमधील ॲप्स अपडेट ठेवणे […]

अधिक वाचा...

मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…

मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. […]

अधिक वाचा...

ट्रकने पिकअप व्हॅनला दिलेल्या धडकेत धामणगावजवळ ५ प्रवासी मृत्यूमुखी…

अमरावतीः अमरावती जिल्ह्यातील धामणगावजवळ एका भरधाव ट्रकने बोलेरो पिकअप व्हॅनला दिलेल्या धडकेत, पिकअपमधील पाच प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ समृद्धी एक्सप्रेसवेच्या चॅनल ९७ वर दुपारी १२.४५ वाजता हा अपघात झाला. ट्रकने पिकअप व्हॅनला मागून धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि २१ जण जखमी झाले आहेत. जखमींना […]

अधिक वाचा...

ईडीचे पॅनकार्ड क्लबवर छापे; ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ स्थावर मालमत्ता जप्त…

मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-१ ने, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत पॅनकार्ड क्लब्स लिमिटेड आणि इतरांविरुद्धच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, ६४६.५८ कोटी रुपये किमतीच्या सुमारे २११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये व्यावसायिक कार्यालयीन जागा, आलिशान हॉटेल्स, कार्यरत रिसॉर्ट्स, शेतजमीन आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. […]

अधिक वाचा...

पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…

ठाणे: मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळीपूर्णेकर यांच्यावर ५ राऊंड फायर झाले. त्यापैकी, २ गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून, एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागली आहे. त्याशिवाय […]

अधिक वाचा...

मित्राच्या ‘शेवटच्या कॉल’मुळे आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा उलगडा होणार का?

मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा केल्यानंतर, गुन्हे शाखेने आता त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, वाकोडेने फोनवर एका मित्राला सांगितले होते की, त्याला थर्मोडायनामिक्स थिअरीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले होते आणि तो अस्वस्थ होता. त्याने असेही सांगितले की, परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना पकडला गेला होता. मुंबई गुन्हे […]

अधिक वाचा...

शौचालयातील विषारी वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू; राम मंदिर परिसरातील घटनेने खळबळ…

मुंबई: गोरेगाव (पूर्व) येथील राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात संशयित रासायनिक विषारी वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रभाकर धनिवार (वय २४) आणि भाविन देसाई (वय १८) या दोघांचा मृत्यू झाला असून मुंबई अग्निशमन दल, पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेच्या अधिकारी पुढील तपास करीत आहेत. गोरेगाव पूर्व […]

अधिक वाचा...

‘मुलीला घेऊन जा, नाहीतर…,’ जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत आयटी अभियंता वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप…

पुणे: लग्नाला अवघे चार महिने झाले होते. वय अवघे २३ वर्षे आणि आयटी क्षेत्रात नोकरी. नव्या संसाराची सुरुवात झालेल्या वैष्णवी प्रवीण जरांडे हिचा पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरातील सासरी मृत्यू झाल्याने, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री मृत्यूपूर्वी वैष्णवीने आईला फोन करून सासरी होत असलेल्या कथित त्रासाबाबत सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याच रात्री तिच्या […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्ग ते पुण्यापर्यंत ६ तास पाठलाग करून १.१३ कोटींचा गुटखा एफडीएकडून जप्त…

मुंबई: समृद्धी महामार्गापासून पुण्यापर्यंत चाललेल्या सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी चाकण-तळेगाव चौकात एका ट्रक अडवून १.१३ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एफडीएच्या पथकांनी मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टाटा ट्रकचा पाठलाग सुरू केला. हा […]

अधिक वाचा...

अकोल्यात विश्वासू हमालानेच मालकाला बांधून लुटले ५४ लाख…

अकोलाः सुमारे पाच वर्षांपूर्वी कामावर ठेवलेल्या एका हमालांनीच विश्वासघात करून दरोडा घातला. वरच्या मजल्यावर असलेल्या घरातून खाली दुकानात कामगारांना सूचना देण्यासाठी येण्याच्या तयारीत असतानाच, या हमालांनी घरात घुसून मालकाचे हात-पाय बांधले आणि सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख रुपये लुटून पलायन केले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!