पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला शेतामध्येच जिवंत जाळल्याची घटना बरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

नेपाल सिंह याच्या पत्नीचे (वय ३५) गावातील एक युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही शेतामध्ये एकत्र असल्याची माहिती नेपाल याला मिळाली होती. त्याने शेतात जाऊन पाहिले असता दोघे नको त्या अवस्थेत आढळले. रागाच्या भरात त्याने पत्नीला मारहाण केली आणि शेताला आग लावून दिली. यावेळी प्रियकर घटनास्थळावरून पळून गेल्यामुळे वाचला. पण, महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा कोळसाच पाहण्यास मिळाला होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पाचरण करून आरोपीला अटक केली. मृत महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!