पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…

ठाणे: मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळीपूर्णेकर यांच्यावर ५ राऊंड फायर झाले. त्यापैकी, २ गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून, एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागली आहे. त्याशिवाय धारदार शस्त्राने पाठीवर, पोटावर आणि हातावर वार देखील करण्यात आले आहेत. या हल्ल्यात प्रदीप पूर्णकर यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी पप्या शिंदेला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ६ ते ७ महिन्यांपासून पप्या शिंदे हे प्रदीप पूर्णेकरांसोबत बोलत नव्हते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पप्या शिंदे प्रदीप पूर्णेकरसोबत होता. पप्या शिंदे आणि प्रदीप पुर्णेकर यांची जुनी मैत्री असून चांगले मित्र होते. पप्या शिंदेंवर सन २००४ पासून ते आतापर्यंत ८ ते ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच, २०१४ मध्ये पप्या शिंदेला तडीपार करण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी पप्या शिंदे प्रदीप पूर्णेकरसोबतच होता. विशेष म्हणजे, गोळीबाराच्या घटनेनंतर काल रात्री प्रदीप पुर्णेकरला पप्या शिंदेने जवळच्या रुणालयात दाखल केले होते. मात्र, पप्या शिंदेनेच हा गोळीबाराचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्णेकर हल्ला प्रकरणा एकूण ५ आरोपी असून त्यापैकी एकाला अटक झाली आहे, इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे. तर अजून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
आरोपी पप्या शिंदे यानेच इतर आरोपींना कार्यालयात आणले होते. त्याचा या कटात सहभाग होता, त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा पप्या शिंदे आधीपासून प्रदीप यांचा मित्र म्हणून कार्यालयात जाऊन बसला होता. त्याने खूप वेळ गप्पा मारल्यानंतर इतर आरोपींना हिंट दिली. कनोजिया उर्फ टल्ली याने गोळ्या झाडल्या, सोबत शूटर नावाचा आरोपी होता. या दोघांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे. तर इतर दोन आरोपींनी चॉपर आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर, हे चौघे पळून गेले पण पप्या शिंदे तिथेच होता. प्रदीप यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत पप्या शिंदे सोबत होता. पण त्याच्यावर पोलिसांना संशय आला म्हणून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसांनी चारपैकी एका आरोपीला अटक केली आहे. राजकीय आणि सामाजिक कारणावरान वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी क्राइम ब्रांचसह ९ ते ९ पथके रवाना करण्यात आल्या आहेत, लवकरच बाकीचे आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!