नवरा कामाला गेला की प्रियकराला घरी बोलवायची; एक दिवस…
पाटणा (बिहार) : एक विवाहीत महिला पती कामाला गेल्यानंतर प्रियकराला घरी बोलवत होती. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समजल्यानंतर नवऱयाला धक्का बसला. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारमध्ये कटिहारमध्ये धक्कादायक घटना घडली. जगदीशपूरमधल्या प्रीतम शाह याचे 13 वर्षांपूर्वी भागलपूर रंगरा पोलिस स्टेशन हद्दीतल्या टंगा दियारा येथील एका युवतीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली; मात्र पतीने आरोप केला की तो कामावर गेल्यावर पत्नी तिच्या प्रियकराला घरी बोलवत होती.
पत्नीचे प्रेमप्रकरण 13 वर्षांनी समजले. पत्नीला जाब विचारल्यापासून दररोज भांडणं होऊ लागली. हे प्रकरण नंतर पंचायतीपर्यंत गेलं; मात्र पत्नी सुधरली नाही. तिच्या प्रियकराला भेटतच होती. आठ महिन्यांनी अचानक ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. पत्नीने घरातून जाताना दागिने आणि पैसे नेले, असा आरोप प्रीतम शाहने केला आहे.
पत्नी घरातून निघून गेल्यावर प्रीतम त्याच्या सासरी गेला. तिथे सासू, सासरे, मेहुणा आणि इतर काही जणांनी त्याला खूप मारहाण केली. प्रीतमने कोर्टात दाद मागितली आहे. पत्नी मुलांना भेटू देत नाही, असा आरोप त्याने केला आहे. ‘मला फक्त माझी मुले हवी आहेत, तिला ज्याच्यासोबत राहायचं असेल त्याच्यासोबत तिने राहावं, तिच्याशी काही घेणं-देणं नाही,’ असे प्रीतम शाह म्हणाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…
Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
वडिलांना अचानक जाग आली अन् पाहिले तर मुलगी प्रियकराच्या मिठीत…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…