पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू…
सातारा : पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड-ढेबेवाडी मार्गावर हा अपघात घडला आहे. सुजल उत्तम कांबळे (वय १७, रा. कोळीवाडी) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कराड-ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले आहे. यावेळी झालेल्या अपघातामध्ये सुजल […]
अधिक वाचा...कुटुंबातील ५ नव्हे तर १६ जणांच्या हत्येचा होता दोघींचा कट…
गडचिरोली : कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून दोन महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचा कट आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात उघड झाला आहे. २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका […]
अधिक वाचा...पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…
पुणे : कारचालकाशी झालेल्या वादातून पीएमपी चालकाने बेदरकारपणे वाहनांना धडक दिल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. बसने धडक दिल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी चालकास अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नीलेश ज्ञानेश्वर सावंत (वय 31, रा. अतुलनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी […]
अधिक वाचा...विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…
बीड : विवस्त्र महिला रस्त्यावरून धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी हा प्रकार घडला. या व्हिडीओ प्रकरणी भाजप आमदाराच्या पत्नीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा […]
अधिक वाचा...ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…
मुंबई: बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल (वय ६५) यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील खार भागात अभिनेते दलीप ताहिल कार चालवत असतानाच त्यांनी एका रिक्षाला धडक दिली होती. ही घटना 2018 मध्ये घडली होती. रिक्षात असलेली महिला जखमी झाली होती. […]
अधिक वाचा...कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…
भुवनेश्वर (ओडीशा): घरा शेजारचा पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या युवकाने त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गुप्तांगात रॉड घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवाय, युवकाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदन नायक असे आरोपीचे नाव याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले […]
अधिक वाचा...विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…
बीड : दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन त्रिंबक मेटे (वय ३४) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…
पुणे : एक ज्येष्ठ नागरिक कॉल गर्लला भेटल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ३० लाख रुपयांना लुबाडल्यानंतर दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्येष्ठ नागरिकाने ज्योती नावाच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): गुन्हेगार मित्राच्या जामीनासाठी ठाणे येथून अट्टल सोनसाखळी चोर बोलावून पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद व गुन्हयातील ०१,१५,००० रुपये किमंतीच्या दोनसोनसाखळया हस्तगत तसेच पुणे शहरातील चैन स्नॅचींगचे ०४ गुन्हे उघडकीस करण्यात भारती विद्यापीठांना यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत १२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड […]
अधिक वाचा...संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
लखनौ (उत्तर प्रदेश) : हमीरपूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलीला गंभीर अवस्थेत ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अंगणात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या चुलत्याने (वय ३०) बलात्कार केला. यामुळे मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मुलीच्या […]
अधिक वाचा...
