पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
पुणे : श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि कांड असा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या एका भोंदूबाबाने दैवी शक्ती प्राप्त असल्याचा आव आणून लोकांच्या अंधश्रद्धेचा भयंकर गैरफायदा घेतला. एका अल्पवयीन चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या नराधमावर करण्यात आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वप्नील लांडे असे […]
अधिक वाचा...लग्नाला काही महिने बाकी असतानाच युवक-युवतीचा आढळला मृतदेह…
कोची (केरळ) : लग्नाला अवघे काही महिने बाकी असतानाच कासारगोड येथील युवती आणि कन्नूर येथील तिच्या होणाऱ्या पतीचा मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. युवतीची बॉडी कर्नाटकातील राहत्या घरी, तर तरुण केरळमधील एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळला. लग्नाला अवघे काही महिने बाकी असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा […]
अधिक वाचा...IPS अधिकारी राहुल बन्सल लाच प्रकरणात अडकले; मुलाखतीदरम्यान म्हणाले होते…
नवी दिल्ली : नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना तयारीदरम्यानच्या मुलाखतीदरम्यान ५०० रुपयांची लाचही घेतली जाऊ नये, असे सांगणारे IPS अधिकारी राहुल बन्सल सध्या एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात अडकले आहेत. २०२२ च्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी राहुल बन्सल यांच्यावर सायबर फसवणूक प्रकरण सोडविण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. नागरी सेवेच्या तयारीदरम्यानचा राहुल […]
अधिक वाचा...पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…
नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज (गुरुवार) येथील श्री हजूर साहिब अंतर्गत असलेल्या माता साहेब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांपैकी नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने मानसिक धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड मधील मोशी […]
अधिक वाचा...कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्याच्या मोबाईलमध्ये आढळले तब्बल 90 अश्लील Video…
बंगळूर : बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल 90 अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तपास अधिकारी डिव्हाइसमधील सर्व व्हिडिओ फाइल्स, फोटो आणि इतर डिजिटल डेटाची तपासणी करत आहेत. हे साहित्य कुठून आले, ते कधी डाउनलोड केले गेले आणि त्याचा रेवण्णाशी संबंधित गुन्हेगारी कारवाईशी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात युवतीचा अकस्मात संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मृत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे. मृत युवतीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण […]
अधिक वाचा...राजस्थानमधून आरोपीने कुरिअरने मागवल्या तब्बल ४१ तलवारी अन्…
जालना : जालना शहरातील सुंदरनगर भागातील आरोपीच्या घरातून पोलिसांनी ४१ तलवारी जप्त केल्या असून, याप्रकरणी शेख माजेद शेख लतिफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे, राजस्थानातील अजमेरमधून आरोपीने कुरिअरने या तलवारी मागवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खून आणि लुटमारीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना…
पुणे : पुणे शहरातील खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने या नवजात अर्भकाला नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत अर्भक स्त्री जातीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले […]
अधिक वाचा...शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…
मुंबई: शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार माहिम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली […]
अधिक वाचा...
