पालघर रुग्णालय हल्ला प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे…

मुंबई: पालघर येथील एका खासगी रुग्णालयात तोडफोड आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न केल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हे अतिशय संवेदनशील प्रकरण असूनही पोलिसांनी या प्रकरणात अजिबात तपास केलेला नाही हे पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. […]

अधिक वाचा...

जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदाराच्या मुलासह १७ जणांविरुद्ध गुन्हा…

पालघर: दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून पालघरमधील खासगी रुग्णालयात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सीटी स्कॅन आणि डिस्चार्जच्या मुद्द्यावरून झालेल्या या वादात रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा...

रेशनकार्डसाठी लाच मागणाऱ्या तहसील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले…

पालघर: नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी, डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील गोदाम लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी डहाणू तहसील कार्यालयात करण्यात आली. सचिन बाळासाहेब व्हरगर हा डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गोदाम लिपिक आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रेशनकार्ड काढून देण्यासाठी प्रति रेशनकार्ड ५०० रुपये याप्रमाणे ८ रेशनकार्डसाठी एकूण ४ हजार रुपयांची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!