वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका अन् मुलाचा फेसबुकवर इशारा…
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिक कराड सातत्याने जामीनासाठी प्रयत्न करत आहे. प्रथम सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली […]
अधिक वाचा...पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख याला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे. दौंडचे […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले आणि गुढ उकलले. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव पूजा (वय २७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट […]
अधिक वाचा...पुणे! घरी सांगितले चेन्नईला जातोय अन् २४व्या मजल्यावरून मारली उडी…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये युवकाचा २४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कुटुंबाला कामासाठी चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते, मात्र तो शहरातच थांबला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैभव हा चांदखेड परिसरातील त्याचा […]
अधिक वाचा...काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन घरफोडी चोरांना ठोकल्या बेड्या…
पुणे : काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ या कालावधीत गंगेश्वर यादव यांच्या तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर येथील बंद घराचा दरवाजाचा कोयंडा उपसून अज्ञात व्यक्तीने घरात […]
अधिक वाचा...पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे: पुणे शहराच्या विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून उडी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात आगीचे रौद्र रूप, ६० वाहने जळून खाक…
पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात आज (सोमवार) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ६० वाहने जळून खाक झाली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहने जळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
सोलापूर : सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून प्रेम अंकुश जाधव (वय 28) याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे. प्रेम अंकुश जाधव […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचाऱ्याला म्हणाला दोन दिवसांत बघून घेतो अन् रस्त्यावरच झोपला…
छत्रपती संभाजीनगर : पोलिस कर्मचारी वाहतूकीचे नियंत्रण करत असताना मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस; यंत्रात स्कार्फ अडकला अन् गेला जीव…
पुणे : भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात वाढदिवसाचा दिवशीच महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकल्याने झालेल्या दुर्घटनेत शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुरंगवडी गावात शनिवारी (ता. २१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शुभांगी राऊत या आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात वाटाणा आणि मसूर […]
अधिक वाचा...
