Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला असून, 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसत आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी संपूर्ण योजना आखली होती. पहलगाममध्ये […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
श्रीनगर (जम्मू काश्मीर): पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत, अशी विचारणा केली. तसेच काही पर्यटकांना […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात नौदलातील अधिकारी विनय नरवाल (वय २६) यांचाही मृत्यू झाला आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेने त्यांच्या गावी एकच शोककळा पसरली आहे. विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
श्रीनगरः जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना पल्लवी म्हणाली की, […]
अधिक वाचा...Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
श्रीनगर: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १२ पर्यटक आणि २ स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसर घेरून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात ही घटना घडली आहे. सुरक्षा दलांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे. संपूर्ण परिसराला वेढा […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): जमीनीच्या वादातून युवकाचा निर्घुन खून करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून २४ तासाच्या आत आंबेगाव पोलिसांनी कौशल्यपुर्ण कामगिरी करत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज येथील जमीनीच्या वादातून २०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३ / ४५ वाजताचे सुमारास साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळाशेजारी, कात्रज पुणे येथे एका युवकाचा […]
अधिक वाचा...IPS ओम प्रकाश मासे खात असतानाच काढला त्यांचा ‘काटा’…
बंगळूरू: कर्नाटकचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि IPS ओम प्रकाश यांच्या हत्येबाबत पत्नी पल्लवी आणि मुलीवर आरोप आहे. डायनिंग टेबलवर बसून मासे खात असताना वाद झाला आणि ओम प्रकाश यांच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पत्नी आणि मुलगी कृती हिला पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून मासे खात होते. त्याच […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…
मुंबई : पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आज (सोमवार) दोषी ठरलेल्या अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा सुनावली. मागील सुनावणीत कोर्टाने निकाल सुनावत दोषी अभय कुरुंदकर याच्यासह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांना देखील दोषी ठरवले होते. या दोघांना पुरावे नष्ट करणे आणि इतर आरोपांत दोषी ठरवले आहे. […]
अधिक वाचा...कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…
मुंबई : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची घरातच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयपीएस ओम प्रकाश त्यांनी २०१५ ते २०१७ पर्यंत डीजीपी पद भूषवले. ते १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होते. त्यांचा मृतदेह […]
अधिक वाचा...डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…
सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्याय दंडाधिकारी दीपक […]
अधिक वाचा...
