
पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…
मुंबई : पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आज (सोमवार) दोषी ठरलेल्या अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा सुनावली. मागील सुनावणीत कोर्टाने निकाल सुनावत दोषी अभय कुरुंदकर याच्यासह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांना देखील दोषी ठरवले होते. या दोघांना पुरावे नष्ट करणे आणि इतर आरोपांत दोषी ठरवले आहे.
अश्विनी बिद्रे प्रकरणामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, हत्याकांडातील सहआरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी शिक्षा सुनावली.
दरम्यान, अश्विनी बिद्रे 2005 मध्ये पोलिस दलात भरती झाल्या होत्या. सांगली येथे नियुक्ती असताना अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले. अश्विनी आणि अभय दोघेही विवाहित होते. पण अभयने अश्विनीला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनीने आपल्या पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहते.
अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. पण कुरुंदकरला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. कुरुंदकर त्याच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता, तर अश्विनी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. अश्विनीच्या तगाद्याला वैतागून अखेर कुरुंदकरने तिचा काटा काढण्याचे ठरवत तिला संपवले.
कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…
पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

