
प्रायव्हेट Video व्हायरल करण्याची धमकी; CA ची आत्महत्या…
मुंबई : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या एका सीएने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज लिला मोरे असे आत्महत्या केलेल्या सीएचे नाव आहे.
वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष प्यायच्या आधी राजने तीन पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी पोलिसांना तपासामध्ये सापडली आहे. राजने त्याच्या चिठ्ठीमध्ये राहुल परवानी आणि सबा कुरेशी या दोन व्यक्तींना जबाबदार धरले आहे. या दोघांनीही आपल्याला कंपनीच्या खात्यातून पैसे चोरण्यास आणि स्वतःच्या सेव्हिंग मोडायला लावल्या, असा आरोप राजने त्याच्या चिठ्ठीमध्ये केला आहे. राजची चिठ्ठी सापडल्यानंतर वाकोला पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खंडणी तसेच आयुष्य संपवायला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
आरोपींना राजची शेअर बाजारातली मोठी गुंतवणूक आणि त्याच्या उच्च पगाराच्या नोकरीची माहिती होती. यानंतर त्यांनी राजला त्याचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. यानंतर दोन्ही आरोपींनी राजला त्याच्या फर्मच्या खात्यातून पैसे त्यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला भाग पाडले. शिवाय, एक आलिशान कारही घेतली होती.
राजने त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहिले की, ‘माफ कर आई, मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा होत्या पण मी तुम्हाला एकटे सोडत आहे. मी माझ्या कर्मासाठी जात आहे. देव तुम्हाला पुढच्या आयुष्यात माझ्यासारखा मुलगा कधीही देऊ नये. मी खूप वाईट आहे, पूनम काकू, कृपया माझ्या आईची काळजी घ्या. माझ्या विविध खात्यांमध्ये पॉलिसी आहेत. ते पैसे घ्या आणि ते माझ्या आईला द्या. खूप वाईट वाटतंय.’
‘मी राज मोरे, आज आयुष्य संपवत आहे. यासाठी राहुल परवानी जबाबदार आहे. त्याने मला अनेक महिने त्रास दिला आणि ब्लॅकमेल केले, त्याने मला माझी बचत मोडण्यास भाग पाडले आणि माझ्या कंपनीच्या खात्यातून पैसे चोरले, राहुल परवानी आणि सबा कुरेशी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. शेवटचा निरोप राज मोरे,’ असे राज त्याच्या चिठ्ठीमध्ये म्हणाला आहे.
दरम्यान, राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांनी मागच्या 18 महिन्यांमध्ये प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन राजकडून 3 कोटी रुपयांपेक्षा जास्तची रक्कम लुटली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
जुगाराच्या नादात झालेले कर्ज फेडण्यासाठी पोलिस अधिकारीच बनला चोर…
आमदार सुरेश धस यांच्या मुलाने हॉटेल व्यावसायिकाला उडवले, त्याच जागी कुटुंबातील तिघांचा…
पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…
सातारा हादरला! विवाहित महिलेची हत्या प्रेमसंबंधातून; आरोपीला अटक…
महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

