मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…
मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. […]
अधिक वाचा...फ्लायदुबई विमानातील सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने केला होता हल्ला…
अबू धाबीः दुबई-तेल अवीव फ्लायदुबई विमानाचे सह-वैमानिक हमाम अल हम्मामी या सहवैमानिकाने भारतीय वीर वैमानिक कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर चाकूने नव्हे, तर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने हल्ला केला होता, असे संयुक्त अरब अमिरातीच्या अभियोक्त्यांनी शनिवारी पुष्टी केली. अल हम्मामीने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक व्यावसायिक विमानात अपघात बचाव […]
अधिक वाचा...ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोन संशयितांना अटक…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी आणखी दोन […]
अधिक वाचा...आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची कारवाई…
पुणे: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीदरम्यान बुडून मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर, प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकृत परवान्याशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय आळंदीत बेकायदेशीरपणे चालवली जाणारी ‘विनर्स अकॅडमी’ ही खासगी शिकवणी संस्था, आळंदी नगरपरिषदेने शुक्रवारी सील केली आहे. गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत, आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे ४८ विद्यार्थी आणि शिक्षकांचे पथक (२५ […]
अधिक वाचा...अमेरिकेतील ओहायोमध्ये स्वामीनारायण मंदिरावर समाजकंटकांचा विटा फेकून हल्ला; सुदैवाने जीवितहानी नाही…
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिरावर समाजकंटकांनी विटांनी हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी मंदिरात पुजारी आणि अनेक भाविक उपस्थित होते. ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिर वडतालधामला लक्ष्य करण्यात आले होते. हल्लेखोरांनी मंदिरावर […]
अधिक वाचा...गुवाहाटीच्या नाईटक्लबमध्ये महिलेचा विनयभंग; विवस्त्र करून मारहाण; बाऊन्सर्सवर आरोप…
गुवाहाटीः शहरातील खानापारा भागातील एका नाईटक्लबमध्ये, गुरुवारी रात्री उशिरा एका महिलेवर हल्ला करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. बाऊन्सर्सनी तिला विवस्त्र करून मारहाण केल्याचाही आरोप आहे. ही घटना ‘द लोकल्स कॅफे अँड लाउंज’ येथे घडली आहे. पोलिसांनी क्लबच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याची माहिती, पोलिसांनी दिली. या महिलेची ओळख पटू शकली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांकडून मनसेच्या नेत्याला अटक; अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक…
मुंबई: पवईत बनावट लीज डीड प्रकरणात मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 2) अटक केली आहे. हिरानंदानी ग्रुपच्या संचालिका अलका भाटिया उर्फ अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्याचा आरोप गणेश चुक्कल यांच्यावर करण्यात आला आहे. अलका हिरानंदानी या अभिनेता अक्षय कुमारच्या बहिण आहेत. पवईमधील फ्लॅट नं. 3505, ओडोनियो बिल्डिंगसाठी 30 वर्षांची […]
अधिक वाचा...दिवेआगर दुर्घटना! पोलिस ठाण्यात सुरु होती मीटिंग; फोन वाजला अन् नावांची यादी उघडताच…
पुणे : आळंदी येथील ‘विनर्स अॅकॅडमी’ या कोचिंग क्लासच्या 11th आणि 12th सायन्सच्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. आता या घटनेनंतरची आंळदी येथे शोककळा पसरली आहे. संबंधित घटना घडली त्यावेळी गुरुवारी 1 ऑक्टोबरला आळंदी पोलिस ठाण्यात नेमकी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी केळगावचे पोलिस पाटील असणारे युवराज वहिले देखील उपस्थित होते. बैठक […]
अधिक वाचा...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, नाव उघड…
दुबई: दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…
छत्रपती संभाजीनगर : वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे घडली आहे. या प्रकरणी मृत गर्भवती महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर […]
अधिक वाचा...
