स्वामी चैतन्यानंदचे लैंगिक शोषणाचे काळे धंदे आले समोर…
नवी दिल्ली: वसंत कुंज आश्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींनी धैर्याने तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने आरोप करताना म्हटले आहे की, ‘स्वामीने काही मुलींना शारीरिक संबंधासाठी धमकावले होते. संबंधित विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील संभाषण आधीच डिलीट केले गेले असून […]
अधिक वाचा...पुणे! ससून हॉस्पिटलमधील 11व्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णाचा मृत्यू…
पुणे: ससून रुग्णालयात आज (गुरुवार) सकाळी एका मनोरुग्णाने 11व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय नावाच्या या रुग्णाला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी विजयने रेल्वेसमोर […]
अधिक वाचा...पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याच्या सहकार्याची ओळख दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद युसुफ कटारिया (वय २६) अशी आहे. युसुफ कटारिया जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षक आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जात […]
अधिक वाचा...धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…
चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते […]
अधिक वाचा...आश्रमाच्या नावाखाली स्वामी चैतन्यानंद करत होता अश्लीलता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लिल प्रकार पोलिसांसमोर उघड केला आहे. वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील आंदेकरविरुद्ध कोमकर यांच्यातील संघर्षामुळे पुणे हादरल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संपूर्ण आंदेकर कुटूंब तुरूंगात असून कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांविरोधात मासे विक्रेत्यांकडून गेल्या 12 वर्षांत 20 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गंभीर गुन्हा नुकताच फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. खंडणी […]
अधिक वाचा...बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील बायपास परिसरात […]
अधिक वाचा...युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…
नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा […]
अधिक वाचा...हिंगोलीत रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरार! बाप-लेकांचा जागेवरच मृत्यू…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठीकारवाई केली आहे. पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील गुंडांच्या […]
अधिक वाचा...
